Stray dog attack Pudhari
सांगली

Sangli stray dog attack: सांगलीत सात वर्षांच्या बालकावर कुत्र्याचा हल्ला

सांगलीतील त्रिकोणी बागेजवळ खेळत असलेल्या एका सात वर्षांच्या बालकावर पिटबुल जातीच्या श्वानाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली.

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगलीतील त्रिकोणी बागेजवळ खेळत असलेल्या एका सात वर्षांच्या बालकावर पिटबुल जातीच्या श्वानाने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी घडली. या हल्ल्यात ऋतुराज भोसले (वय 7, रा. त्रिकोणी बागेजवळ, सांगली) हा बालक जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी की, ऋतुराज भोसले हा सोमवारी सायंकाळी त्रिकोणी बागेजवळ खेळत असताना परिसरातील एका श्वानमालकाच्या पिटबुलने त्याच्यावर झडप घातली. श्वानाने केलेल्या हल्ल्यामुळे ऋतुराजच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यभागी, कपाळावर आणि डोळ्याच्या बाजूला खोलवर जखमा झाल्या आहेत. ऋतुराजने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने पिटबुलला बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

कायदेशीररीत्या पिटबुल जातीचे श्वान पाळण्यावर किंवा त्यांच्या खरेदी-विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. असे असतानाही काही श्वानप्रेमींनी या जातीचे हिंसक श्वान पाळले आहेत. ऋतुराजवरील हल्ल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची प्राथमिक नोंद केली असून पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली आहे. प्रतिबंधित श्वान पाळणे आणि त्याच्या हल्ल्यामुळे बालक जखमी झाल्याप्रकरणी संबंधित श्वानमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT