Stormy rain 
सांगली

Sangli Rain : जिल्ह्यात 30 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाची शक्यता

काही ठिकाणी गारपिटीची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्ह्यामध्ये सोमवारपासून विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान शाखेकडून वर्तवण्यात आली आहे.

30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलदरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

त्याचबरोबर मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटावेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्स्फॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT