Ramzan Eid 
सांगली

Ramzan Eid : सांगलीसह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात

सामुदायिक नमाजपठण ः विश्वशांतीसाठी प्रार्थना; मुस्लिम बांधवांना मान्यवरांच्या शुभेच्छा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली, मिरज शहरांसह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदच्यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण केले. त्यानंतर विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

नमाजनंतर हिंदू बांधवांनी मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांना आलिंगन देत शुभेच्छा दिल्या. खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील, महापौर धीरज सूर्यवंशी, सुमित कदम, पृथ्वीराज पाटील, राजेश नाईक, पोलिसप्रमुख संदीप घुगे, मंगेश चव्हाण, मुन्ना कुरणे, कय्युम पटवेगार, फिरोज पठाण, शिकलगार, जब्बार तहसीलदार, निसार संगतरास, आसिफ बावा, युनूस महात, आयुब बारगीर, युसूफ जमादार आदींनी शुभेच्छा दिल्या. रमजान ईदनिमित्त एक महिना मुस्लिम बांधवांकडून रोजा (उपवास) केला जातो. या महिन्यात दानधर्म करणे पवित्र मानले जाते. काल ईदच्या दिवशी रोजाची सांगता झाली. हाफिज सद्दाम सय्यद, सुफियान पठाण, नोविद मुजावर, डी. जी. मुलाणी आदी यावेळी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT