जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज शाखेत 32 लाखांचा अपहार  
सांगली

Sangli News : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाज शाखेत 32 लाखांचा अपहार

जत पोलिस ठाण्यात बँकेच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जत : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाज शाखेत शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या रकमेत 31 लाख 86 हजार 500 रुपयांचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात बँकेच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हिजिलन्स अधिकारी प्रवीण कोळी (वय 56, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लिपिक संदीप महादेव सोलनकर (रा. जत), शाखाधिकारी जयाजी पांडुरंग शिंदे (रा. डफळापूर, ता. जत), शिपाई कोंडिबा महादेव खरात (रा. बाज, ता. जत) आणि सेवानिवृत्त शाखाधिकारी मौला मिरा शेख (रा. छत्रीबाग रोड, जत) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

2014 ते 2015 मध्ये शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानाच्या रकमेत आरोपींनी संगनमत करून बोगस खाती उघडली. या खात्यांमध्ये तसेच स्वतःच्या खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम वळवून सुमारे 31 लाख 86 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. तसेच ही रक्कम विविध खात्यांवर वर्ग केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. 26 नोव्हेंबर 2015 ते 14 ऑगस्ट 2018 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले असून बँकेने अंतर्गत चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना वर्षापूर्वी निलंबित केले होते. गुरुवारी याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 408, 409, 467, 468 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाज शाखेत शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या रकमेत 31 लाख 86 हजार 500 रुपयांचा अपहार करून बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात बँकेच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हिजिलन्स अधिकारी प्रवीण कोळी (वय 56, रा. विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लिपिक संदीप महादेव सोलनकर (रा. जत), शाखाधिकारी जयाजी पांडुरंग शिंदे (रा. डफळापूर, ता. जत), शिपाई कोंडिबा महादेव खरात (रा. बाज, ता. जत) आणि सेवानिवृत्त शाखाधिकारी मौला मिरा शेख (रा. छत्रीबाग रोड, जत) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे.

2014 ते 2015 मध्ये शेतकऱ्यांसाठी आलेल्या अनुदानाच्या रकमेत आरोपींनी संगनमत करून बोगस खाती उघडली. या खात्यांमध्ये तसेच स्वतःच्या खात्यांमध्ये अनुदानाची रक्कम वळवून सुमारे 31 लाख 86 हजार 500 रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. तसेच ही रक्कम विविध खात्यांवर वर्ग केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. 26 नोव्हेंबर 2015 ते 14 ऑगस्ट 2018 या कालावधीत हा प्रकार घडल्याचे समोर आले असून बँकेने अंतर्गत चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांना वर्षापूर्वी निलंबित केले होते. गुरुवारी याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात भारतीय दंडसंहितेच्या कलम 420, 408, 409, 467, 468 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT