Sangli district bank Pudhari
सांगली

Sangli District Bank Election: जिल्हा बँक निवडणूक मतदार यादी जाहीर

२४४५ मतदार : अंतिम यादी जाहीर; ६८ मतदार वाढले

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात विकास सेवा संस्था, नागरी बँका, पतसंस्था आणि इतर सहकारी संस्था मिळून एकूण २ हजार ४४५ मतदारांचा समावेश आहे.

यामध्ये वाळवा तालुक्यात सर्वाधिक ५८४ मतदार आहेत. काही संस्थांनी शेअर्स भांडवल पूर्ण केल्याने आणि थकबाकी भरल्याने नव्याने ६८ मतदारांची वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागाचे विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार ही यादी जाहीर करण्यात आली.

प्रारुप यादीवर तब्बल २७३ हरकती दाखल झाल्या होत्या. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीनंतर पात्र ठरलेल्या संस्थांचा यात समावेश करण्यात आला. तर अवसायानातील, नोंदणी रद्द झालेल्या आणि थकबाकीदार अशा २०० संस्थांना यादीतून वगळले आहे.

यादीनुसार विकास सेवा सोसायट्यांचे सर्वाधिक ७७८ मतदार आहेत. त्यापाठोपाठ नागरी बँका, पतसंस्था व नोकरांच्या संस्थांचे ७६५, दूध व पाणीपुरवठा संस्थांचे ३४५, खरेदी-विक्री संघ व साखर कारखान्यांचे ९४ तर ग्राहक, गृहनिर्माण व औद्योगिक संस्थांसह वैयक्तिक ४६३ मतदार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT