गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी पथके नियुक्त 
सांगली

Sangli News : गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी पथके नियुक्त

गॅस विक्री प्रतिनिधींची बैठक; तपासणी सुरुच

पुढारी वृत्तसेवा

सांगली : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने आगामी काळात गॅसचा (एलपीजी) काळाबाजार होण्याची शक्यता गृहीत धरुन पुरवठा विभागाने तालुकास्तरावर पथके नियुक्त केली आहेत. त्याचबरोबर 24 तास नियंत्रण कक्षही सुरु आहे. पुरवठा विभागाने गॅस कंपन्यांच्या विक्री प्रतिनिधींची बैठक घेऊन गॅसचे वितरण योग्य प्रकारे करण्याच्या सूचना केल्या.

जिल्हा पुरवठा अधिकारी अशिष फुलूके यांनी बुधवारी जिल्ह्यातील गॅस कंपन्याच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक घेतली. पुरवठा व्यवस्थित करण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर व्यावसायिक गॅसचा पुरवठा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यतील सर्व म्हणजे 90 गॅस एजन्सीची पुरवठा विभागाकडून तपासणी करण्यात आली. महिन्यानंतर सिलिंडर पुरवठा करावा, नोंदणीनुसार सिलिंडर द्यावा, रोज पुरवठा आणि वितरणाची माहिती प्रशासनाला द्यावी, अशी सूचना यावेळी करण्यात आली. गॅस सिलिंडरची संभाव्य टंचाई आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याने गॅसचा काळाबाजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT