दिघंचीतील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू Pudhari
सांगली

Sangli crime : दिघंचीतील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

औषधांच्या गोळ्यांचे अतिसेवनाने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ः तालुक्यातील दिघंची येथील एका 35 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सविता विशाल पडधुने (वय 35, रा. दिघंची) असे मृत महिलेचे नाव असून, औषधांच्या गोळ्यांचे अतिसेवन केल्याने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दि. 31 मार्च रोजी रात्री सविता पडधुने यांची प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने आटपाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सविता यांनी काही औषधांच्या गोळ्यांचे अतिप्रमाणात सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वैद्यकीय सूत्रांनी वर्तविली.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल कवडे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर आटपाडी पोलिस ठाण्यात बीएनएसएस कलम 194 अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओळखून पोलिस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक धनश्री करंजकर यांनी घटनास्थळी भेट देऊन प्राथमिक चौकशी केली. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT