दिघंचीत ६२ वर्षे जोपासली जातेय गज नृत्यकला 
सांगली

Sangli News : दिघंचीत ६२ वर्षे जोपासली जातेय गज नृत्यकला

श्रावणातील पहिल्या सोमवारपासून सुरुवात : गजनृत्याची जोपासना करणे गरजेचे

पुढारी वृत्तसेवा

शिवानंद क्षीरसागर

दिघंची : दिघंची येथे सन १९६४ सालापासून गज नृत्य कला सुरू असून, अपवादाने कोरोनाच्या महामारीमुळे खंडित झाली होती. पुन्हा सालाबादप्रमाणे श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून या गज नृत्यास मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली.

सध्याच्या मोबाईल इंटरनेटच्या व सोशल मीडियाच्या युगात अनेक पारंपरिक रीतिरिवाज व कला लोप पावत असताना दिघंचीत मात्र गजनृत्याची परंपरा अद्याप चांगल्या पद्धतीने जोपासली जात आहे. या खेळाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठी परंपरा आहे. मोठ्या उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने दिघंचीत हा सोहळा संपन्न होत आहे.

प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील सोमवारी ग्रामदैवत महादेव मंदिराच्या परिसरात गजनृत्य खेळले जाते. महादेव मंदिराच्या आवारात फेर धरला जातो. दिघंची येथे सुुरुवातीला दाजीराम पुसावळे यांनी गजनृत्यची सुरुवात केली. त्यावेळी त्यांना राम माईनकर, तायाप्पा माळी, सदा माळी व पांडुरंग मोरे आधी सहकाऱ्यांनी साथ दिली होती. दिघंची परिसरातील लिंगीवरे, राजेवाडी, निंबवडे, वाक्षेवाडी, बनगरवाडी, पुजारवाडी, कटफळ व सांगोला तसेच माण तालुक्यातील गावांमधील माळी व धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात लोक यामध्ये सहभागी होतात.

दिघंचीत महादेव मंदिर परिसरात श्रावणी सोमवार व ढोल, सनई व शिंग वादनाच्या आवाजाने गज नृत्याची मैफल हे समीकरणच झाले आहे. दिघंचीत लोकवर्गणीतून व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तसेच यशादाचे पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पुसावळे तसेच व्यापारी वर्ग, शेतकरी यांच्या विशेष आर्थिक सहकार्यातून सहभागी गजनृत्य मंडळांना व कलाकारांना मानधन फेटा, पानसुपारी देऊन मान्यवरांच्या हस्ते सोमवारी सत्कार करण्यात आला. या खेळातील सहभागी खेळाडूंना मानधन देण्याची प्रथा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT