Sangli District Central Bank File Photo
सांगली

Sangli Bank Recruitment : सांगली जिल्हा बँक लिपिक भरतीची लेखी परीक्षा ३१ ऑगस्टला

सांगलीसह सहा जिल्ह्यांत परीक्षा केंद्रे

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ४४४ कनिष्ठ लिपिक पदांच्या भरतीसाठीची प्रतीक्षा अखेर संपली असून येत्या ३१ ऑगस्टरोजी लेखी परीक्षा होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तब्बल १९ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सांगलीसह कोल्हापूर, सातारा, पुणे, अकोला आणि बीड या सहा जिल्ह्यांतील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेच्या आठ दिवस आधी उमेदवारांना हॉल तिकीट डाऊनलोड करता येणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ४४४ कनिष्ठ लिपिक पदांसाठी 'आयबीपीएस' कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. २४ जूनपासून अर्ज मागवण्यात आले होते, मात्र मध्यंतरी राज्य शासनाने या प्रक्रियेला स्थगिती दिली होती. याविरोधात बँकेने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली असता, न्यायालयाने या भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवली. त्यानंतर बँकेने अर्ज करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदतीत विक्रमी अर्ज प्राप्त झाले. अर्ज सादर करण्याची मुदत संपल्यानंतर महिनाभर परीक्षेची तारीख जाहीर झाली नव्हती. बँकेच्या संचालक मंडळाचे ऑगस्टच्या पंधरवड्यात भरती पूर्ण करण्याचे नियोजन होते, परंतु अर्जदारांची संख्या मोठी असल्याने आयबीपीएसला नियोजनासाठी काहीसा वेळ लागला. अखेर कंपनीने ३१ ऑगस्ट ही परीक्षेची तारीख निश्चित केली आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने गेल्या महिन्याभरापासून तयारी करणाऱ्या उमेदवारांची उत्सुकता संपली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT