Cyber Crime Pudhari
सांगली

Sangli Cyber Police: तक्रारदारांना ३.८५ लाख रुपये परत

एमआरएम पोर्टलचा लाभ; सांगली सायबर पोलिसांची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : केंद्र सरकारच्या नवीन एमआरएम पोर्टलचा प्रभावी वापर करून, सायबर फसवणुकीत अडकलेले तब्बल ३,८५,३६५ रुपये तक्रारदारांच्या बँक खात्यात यशस्वीरित्या सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्‍पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक स्नेहा गिरी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यानंतर नागरिक राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबर १९३० किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवतात. या तक्रारींनुसार फसवणुकीची रक्कम संशयित बँक खात्यांमध्ये तातडीने गोठवली जाते. अशी गोठवलेली ५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम तक्रारदारांना परत देण्यासाठी सरकारने ‘एमआरएम’ हे नवीन पोर्टल सुरू केले आहे. सांगली सायबर पोलिसांनी जून २०२६ पासून या पोर्टलवरील ७५ तक्रारींवर जलद कारवाई करत एकूण ४,७७,८८७ रुपयांच्या रिफंडची प्रक्रिया सुरू केली, ज्यापैकी ३,८५,३६५ रुपये नागरिकांना परत मिळाले आहेत.

पोलिसांचे आवाहन...

जर तुमची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल आणि रक्कम होल्ड झाली असल्यास, नागरिकांनी एमआरएम पोर्टलच्या अधिकृत लिंकवर जाऊन आपला ऑनलाईन तक्रार क्रमांक टाकून रिफंडसाठी अर्ज करावा आणि सांगली सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT