Digital Arrest Scam | ‘डिजिटल अरेस्ट’ची देशव्यापी चौकशी सीबीआय करणार 
सांगली

Sangli News : डिजिटल अरेस्टच्या भीतीने वृद्धाला 59 लाखांचा गंडा

सावळज येथील प्रकार; दया नायक यांच्या वेशातील फोटो, सीबीआयचे लेटरपॅड दाखवून दिली धमकी

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : सावळज (ता. तासगाव) येथील एका निवृत्त वृद्धाला डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देऊन त्याची 59 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तिघांविरोधात तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी आण्णासाहेब बाळागौडा पाटील (वय 61, रा. सुतार गल्ली, सावळज) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. अजय पाटील व दया नायक (या दोघांचा पत्ता माहीत नाही) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, या दोघा संशयितांनी पोलिस असल्याचे भासवून त्यांच्या मोबाईल क्रमांकावरून फिर्यादी पाटील यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. तुमच्या बँक खात्यावर गैरव्यवहार झाला असून तुमच्यावर सर्वोच्च न्यायालयात केस चालू आहे, असे त्यांनी सांगितले. संशयिताने दया नायक यांच्या पोलिस अधिकारी वेशातील फोटो फिर्यादी यांना व्हॉटस्‌‍ॲपवर दाखविले. त्याचवेळी सीबीआयचा लोगोही दाखविला. गव्हर्न्मेंट ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, इन्कमटॅक्स, रिझर्व्ह बँक यांच्या नावांचे खोटे लेटरपॅड व्हॉट्स अपवर पाठविले. तसेच फिर्यादी आण्णासाहेब यांच्या व्हॉट्स अपवर व्हिडीओ कॉल करून त्यांना अटक करण्याची भीती दाखवून धमकी दिली. याला घाबरून पाटील यांनी अटकेच्या भीतीने 8 ते 16 जानेवारी या कालावधीत त्या दोघा संशयितांच्या बँक खात्यावर 59,09,000 रुपये पाठविले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी तासगाव पोलिसात धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT