Fraud Case file photo
सांगली

Sangli fraud Case : सांगलीत एकाला नऊ लाखांचा गंडा

औद्योगिक इंधन देण्याच्या बहाण्याने फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : स्वस्तात औद्योगिक इंधन देण्याच्या बहाण्याने सांगलीतील एकाला तब्बल ९ लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पेट्रो केमिकल्सचे अरुण रामचंद्र मोरे यांनी चौघांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यामध्ये गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये प्रकाश गणपती जगताप (रा. नंदगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर), फाल्कन ग्रुप ऑफ कंपनीचे मालक सिद्धीकी मानूर (रा. कामरेज, सुरज), आणि प्रकाश आहीर (रा. करटगम, सुरज) यांचा समावेश आहे. वरील तिघांनी अरुण मोरे यांना स्वस्तात मिक्स हायड्रो कार्बर हे औद्योगिक इंधन देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार त्यांच्याकडून सहा लाख रुपये ऑनलाईन आणि तीन लाख रुपये रोख स्वरुपात घेतले. ९ लाखांची रक्कम घेऊनही औद्योगिक इंधन न दिल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी तिघांविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT