Crime Pudhari
सांगली

Sangli Crime: गुन्हेगाराकडून रुग्णवाहिकेची तोडफोड

सिव्हिल चौकात धिंगाणा ; पोलिसांकडून तत्काळ कारवाई

पुढारी वृत्तसेवा

सांगली : येथील सिव्हिल रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीजवळ उभ्या असणाऱ्या रुग्णवाहिकेची गुरुवारी रात्री तोडफोड करण्यात आली. हद्दपार गुन्हेगाराच्या या धिंगाण्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली.

दरम्यान नागरिकांनी तातडीने एलसीबी निरीक्षक संजीव झाडे यांना माहिती दिली. त्याच्या पथकाने तत्काळ त्या हद्दपार गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली. प्रसाद उर्फ प्रशांत दिलीप चौगुले (वय 27, रा. इंदिरानगर, सांगली) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, चौगुले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. सांगली शहर पोलिसांनी त्याच्यावर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. तो कोणतीही पुर्व परवानगी न घेता सांगलीत वावरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे. गुरुवारी तो साथीदारांसमोबत सिव्हिलचौकात दुचाकीवरून आला. त्यानेकाठीने दोन रुग्णवाहिकांची तोडफोड केली. भर रस्त्यावर झालेल्या या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली.

दरम्यान, याबाबत एलसीबीचे निरीक्षक झाडे यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने तातडीने चौगुले याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. गुन्हेगाराने ही तोडफोड दहशत माजवण्यासाठीच केल्याचे तपासात पुढे आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT