माव्याच्या वादातून भोसकलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू 
सांगली

Sangli Crime : माव्याच्या वादातून भोसकलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खुनाचा गुन्हा दाखल : मुख्य संशयितासह दोघांना अटक; एक पसार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहरातील वडर गल्ली येथे मावा मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादातून रविवार, दि. 25 रोजी नारायण सुरेश पवार (वय 30, रा. वडर गल्ली, सांगली) याला चाकूने भोसकण्यात आले होते. त्यास सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्य संशयित सूरज ऊर्फ बिल्ला रामा पवार आणि कुणाल तातोबा जाधव (दोघे रा. वडर गल्ली, सांगली) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे, तर चंदू नाईक हा अद्याप पसार आहे. त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत नारायण पवार आणि संशयित हे एकमेकांचे नातेवाईक होते. दि. 25 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास वडर गल्ली येथे संशयित थांबले होते. त्यावेळी नारायण पवार हा त्या ठिकाणी गेला. त्याने तिघांकडे मावा मागितला. त्यावेळी संशयितांनी ‌‘आम्ही मावा कोणाला देत नाही आणि कोणाकडून घेतही नाही‌’ असे सांगितले.

त्या कारणातून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. वादावादीचे पर्यावसन हाणामारीत झाले. संशयितांनी चाकूने नारायण याच्या पोटावर, पाटीवर वार केले. तसेच त्याच्यावर दगडाने हल्ला केला. मारहाणीत नारायण गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यार शस्त्रक्रियाही करण्यात आली. परंतु अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला तिघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता नारायण याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT