गुन्हा करण्याच्या तयारीतील तरुणाला अटक File Photo
सांगली

Sangli Crime : गुन्हा करण्याच्या तयारीतील तरुणाला अटक; कोयता जप्त

कुपवाडजवळील घटना; अनर्थ टळला

पुढारी वृत्तसेवा

कुपवाड : कुपवाड ते कानडवाडी जुन्या रस्त्यालगत असलेल्या वनविभाग कार्यालयाच्या समोर गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला कुपवाड पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळील धारदार कोयता पोलिसांनी जप्त केला.

कुपवाड पोलिस ठाण्यातील गुप्त विभागाचे हवालदार संदीप घस्ते बुधवार दि. ३ रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास गस्तीवर होते. कुपवाड ते कानडवाडी जुन्या रस्त्यालगत असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोरील परिसरात एक तरुण संशयितरित्या फिरत असताना हवालदार घस्ते यांच्या नजरेस पडला. हवालदार घस्ते यांनी तातडीने संशयित तरुणाला ताब्यात घेऊन कुपवाड पोलिस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने महादेव शिंदे असे नाव सांगितले. शहरात गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या तयारीत फिरत होतो, अशी कबुली संशयित शिंदे याने पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयित शिंदे याच्याजवळील धारदार कोयता जप्त करून त्याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT