विधवा महिलेवर अत्याचार File Photo
सांगली

Sangli Crime : दमदाटी करीत विधवा महिलेवर अत्याचार

आटपाडी तालुक्यातील प्रकार; संशयिताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी ःआटपाडी तालुक्यातील एका 30 वर्षीय विधवा महिलेवर ओळखीतील व्यक्तीने दमदाटी करून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून अजय नाना गवंड (रा. लोणारखोरी, आटपाडी) याच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा पती सन 2022 मध्ये निधन पावला असून ती आपल्या दोन मुलांसह राहत आहे. त्यानंतर शेजारी राहणारा संशयित अजय गवंड हा तिच्या घरी ये-जा करत होता. ही महिला त्याच्याशी बोलत नसल्याचा राग मनात धरून, “तू माझी नाही झालीस, तर दुसऱ्या कोणाची होऊ देणार नाही,” अशी धमकी तो देत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

जून 2023 मध्ये रात्रीच्या वेळी संशयिताने घरात घुसून या महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास मुलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने भीतीपोटी महिला शांत राहिली. मात्र त्यानंतरही मार्च 2026 पर्यंत संशयिताने वेळोवेळी दमदाटी करून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, संबंधित प्रकाराबाबत महिलेने संशयिताच्या वडिलांना व नातेवाईकांना माहिती देऊन समज दिली होती. तरीदेखील संशयिताचे वर्तन बदलले नसल्याचे सांगण्यात आले. मंगळवारी दुपारी आटपाडी बसस्थानक परिसरात ही महिला मैत्रिणीसोबत थांबलेली असताना संशयित तेथे आला. “माझा मोबाईल नंबर ब्लॉक का केलास?” असा जाब विचारत त्याने तेथे पडलेल्या बांबूच्या काठीने महिलेच्या हातावर व पायावर मारहाण करून जखमी केल्याची तक्रार करण्यात आली आहे. घटनेनंतर महिलेने ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने आटपाडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT