Assault Pudhari
सांगली

Sangli crime: ईश्वरपुरात गर्भवतीवर बलात्कार

आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्निल संताजी देवकर आणि त्याला मदत करणाऱ्या मेघा विजय वाघमारे या दोघांना ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली

पुढारी वृत्तसेवा

ईश्वरपूर : ईश्वरपूर येथे नातेवाईकांकडे आलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्निल संताजी देवकर (वय 30, मूळ रा. काळमवाडी, ता. वाळवा) आणि त्याला मदत करणाऱ्या मेघा विजय वाघमारे (वय 40, मूळ रा. सातारा) या दोघांना ईश्वरपूर पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित महिला कार्यक्रमानिमित्त ईश्वरपूर येथे नातेवाईकांकडे आली होती. ती आठ महिन्यांची गर्भवती आहे. हे माहीत असतानादेखील संशयित स्वप्निल याने 22 आणि 27 एप्रिल रोजी तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यात मेघा वाघमारे हिने त्याला मदत केली. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या पतीला जीवे मारू, अशी धमकीही संशयितांनी पीडितेला दिली होती.

पीडिता सासरी गेल्यानंतर तिने पतीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. हा गुन्हा ईश्वरपूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी दोन्ही संशयितांना अटक केली. शुक्रवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने स्वप्निल देवकर याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, तर मेघा वाघमारे हिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT