व्हसपेठ येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा File Photo
सांगली

Sangli News : व्हसपेठ येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सातजणांवर गुन्हा; साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

जत : व्हसपेठ (ता. जत) येथे सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर जत पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून सातजणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी, दुचाकी आणि मोबाईल असा ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हसपेठ हद्दीतील धोंडिराम वाघमारे यांच्या खोलीमध्ये काही जण पैशांवर तीनपानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने जत पोलिसांनी सायंकाळी सातच्या सुमारास तिथे छापा टाकला. या कारवाईदरम्यान संशयित जुगार खेळताना रंगेहात आढळून आले.

याप्रकरणी संतोष शिवाजी चौगुले (वय ३९), चेतन ओमकार हुवाळे (वय ३१), नीतेश उत्तम सुगरे (वय ३५) यांच्यासह बाबू उबाळे, विशाल कांबळे, नितीन वसंत निळे आणि सुभाष तात्याप्पा हुवाळे (सर्व रा. व्हसपेठ, ता. जत) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान काही संशयित घटनास्थळावरून पसार झाले असून, पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. या छाप्यात ९ हजार ४५० रुपये रोख, एक मोटार, पाच दुचाकी, तीन मोबाईल आणि पत्ते असा एकूण ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT