मणेराजुरीत अपघातात तरुणाचा मृत्यू  
सांगली

Sangli Accident : मणेराजुरीत अपघातात तरुणाचा मृत्यू

मणेराजुरी - गव्हाण रस्त्यावरील दुर्घटना

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : मणेराजुरी - गव्हाण रस्त्यावर मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल घसरून पडून झालेल्या अपघातात तरुणाचा जागेवर मृत्यू झाला. सुमित शिवाजी निकम (वय २६, रा. मतकुणकी, ता. तासगाव) असे या तरुणाचे नाव आहे. घटनेची नोंद तासगाव पोलिसात झाली आहे. मणेराजुरीचे पोलिस पाटील दीपक तेली यांनी वर्दी दाखल केली आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी : सुमित हा त्याच्‍या मावसभावाला गव्हाण येथे सोडायला रविवारी दुपारी गेला होता. भावाला सोडून सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल (एमएच १० इ वाय ८५१७ ) वरून तो परतत असताना गव्हाण-मणेराजुरी रस्त्यावरील एका वळणावर त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल घसरून तो मोटरसायकलसह रस्त्यावर जोरदार आपटला. त्याच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी अपघाताची माहिती पोलिस पाटील दीपक तेली यांना दिली. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली असता पोलिस हवालदार सागर मगदूम व पोलिस कॉन्स्टेबल अमित पवार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाताचा पंचनामा केला. शवविच्छेदन येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. पोलिस निरीक्षक विशाल टकले यांनी घटनास्थळी भेट दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT