ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू 
सांगली

Sangli Crime : ट्रक चालकाचा संशयास्पद मृत्यू

मुचंडी हद्दीत झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

पुढारी वृत्तसेवा

वळसंग : जत तालुक्यातील मुचंडी–दरिकोणूर परिसरात ट्रक चालक नागेश आनंदा शिंदे (रा. गुड्डापूर, ता. जत) यांचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की घातपात, याबाबत संशय व्यक्त केला जात असून जत पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, नागेश शिंदे हे ट्रक चालक म्हणून काम करत होते. ते ट्रकमध्ये (क्र. एमएच १० सीआर ९५१४) सांगोला येथून पशुखाद्य पेंड घेऊन मुचंडीकडे निघाले होते. मात्र, दरम्यानच्या काळात मुचंडी–दरिकोणूर सीमेवरील मुचंडी हद्दीत त्यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढला. घटनेची माहिती मिळताच जत पोलिस कर्मचारी सुनील गडदे, पोलिस किरण मधुर, मुचंडीचे पोलिस पाटील रोहिदास शिवशरण तसेच आप्पू सर्जे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.

घटनास्थळावरील परिस्थिती पाहता या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही. उत्तरीय तपासणीचा अहवाल, तांत्रिक तपास आणि साक्षीदारांच्या जबाबांनंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. जत पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT