Share Market Fraud Pudhari
सांगली

Sangli News : शेअर मार्केट एजंटाकडून गंडा; ६८ लाखांची फसवणूक

सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सातारा : शेअर मार्केट एजंट असल्‍याचे सांगून शेअर मार्केटमध्ये १० महिने पैसे गुंतवल्‍यास जादा परतावा देतो, असे आमिष दाखवून सहा जणांची फसवणूक केली. तब्बल ६८ लाख २९ हजार रुपयांना गंडा घातला असून याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. विश्वनाथ प्रभाकर शेट्टी (रा. रामाचा गोट, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी जयसिंह राज शेडगे (वय ३४, रा. पंताचा गोट) यांनी तक्रार दिली .

ही घटना १२ जून २०२३ ते ६ जुलै २०२६ या कालावधीत घडली आहे. संशयिताने शेअर मार्केट एजंट असल्‍याचे तक्रारदार यांना सांगितले. शेअर मार्केटमधील सर्व माहिती असल्‍याचे भासवून त्‍यामध्ये गुंतवणूक केल्‍यास एक वर्षाच्या आतच जादा नफा मिळवून देतो, असे भासवले. त्‍यानुसार तक्रारदार यांनी ७ लाख रुपये संशयिताकडे गुंतवले.

पैसे गुंतवल्‍याचा कालावधी झाल्‍यानंतर तक्रारदाराने संशयिताकडे त्‍यांची मूळ रक्‍कम व अधिकचा परतावा मागितला. संशयिताने पैसे देतो, असे सांगून टाळाटाळ केली. यानंतर संशयिताने पैसे परत देण्याचा प्रतिसाद दिला नसल्‍याने फसवणूक झाल्‍याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT