निष्पाप वेदांतच्या मृत्यूने नातेवाईकांचा आक्रोश 
सांगली

Sangli Crime : निष्पाप वेदांतच्या मृत्यूने नातेवाईकांचा आक्रोश

अभयनगर परिसरात तणाव : हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगलीतील एसटी कॉलनी-अभयनगर येथे सराईत गुन्हेगार नीलेश गडदे याने गेलेल्या गोळीबारात १३ वर्षांच्या निष्पाप वेदांत बंडगर याचा मृत्यू झाला. कोणताही संबंध नसताना दोन गटांतील व्यावसायिक वादामध्ये संशयित नीलेश गडदे याने सूड उगवण्यासाठी बालकाचा बळी घेतला. यामुळे परिसरातून तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शासकीय रुग्णालयाच्या परिसरात वेदांतच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. निष्पाप वेदांतच्या हत्येने संतप्त पडसात उमटत होते.

राजकीय पदाधिकाऱ्याचा सहभाग

गोळीबार करून पळून जाणाऱ्या नीलेश गडदेच्या गाडीमध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये अलीकडेच आलेला एक स्थानिक पदाधिकारी असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. बंडगर यांच्या नातेवाईकांनीही या संदर्भात थेट आरोप केला.

पोलिस प्रमुख घटनास्थळी

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक झाडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात तणाव होता. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने राखीव दलाची तुकडी पाचारण केली. रात्री उशिरापर्यंत पंचनाम्याचे आणि माहिती घेण्याचे काम सुरू होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT