चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून 
सांगली

Sangli Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

विटा येथील घटना ः लोखंडी रॉडने मारहाण; पती फरार

पुढारी वृत्तसेवा

विटा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. काजल ऊर्फ श्रद्धा अविनाश लोटके (वय 20) असे मृत महिलेचे नाव आहे, तर संशयित पती सोनल ऊर्फ अविनाश तुकाराम लोटके हा फरार आहे. दोघांचा प्रेमविवाह झाला होता. याप्रकरणी काजलची मावशी दीपाली शशिकांत साठे यांनी फिर्याद दिली आहे. तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी खुनाची घटना घडली.

काजल यांची आई मुंबईला असते, त्यामुळे ती मावशी दीपालीकडेच लहानपणापासून होती. लग्नानंतर सध्या अविनाश आणि काजल येथील सुतारकी मळा परिसरात सुनील मारुती गाडे यांच्या घरात भाड्याने राहत होते. या दाम्पत्याला तीन वर्षांचा मुलगाही आहे. सोमवारी रात्री उशिरा दोघे अष्टमीच्या यात्रेसाठी गावात गेले होते. परत आल्यानंतर त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर पहाटे पत्नी काजल न सांगता कुठे तरी बाहेर निघून गेली आहे, असे सांगून अविनाशने त्याचा मित्र रोहित प्रकाश कोरडे यांच्याकडे मुलाला ठेवले आणि तो निघून गेला; पण तो न परतल्याने रोहितने त्याचे घर गाठले. पण दार न उघडल्याने खिडकीतून आत पाहिले असता ही खुनाची घटना उघड झाली. त्याने घरमालकाला आणि पोलिसांना कळवले. पत्नीच्या चेहऱ्यावर, कपाळावर, डोकीत, उजव्या हातावर लोखंडी रॉडने मारल्याच्या खुणा आहेत.

खुनाचे कारण की...

फिर्यादीत म्हटले आहे की, अविनाशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. तसेच, त्याला तृतीयपंथीयांचा नाद होता. त्यामुळे त्यास पत्नी विरोध करीत होती. यावरून त्यांच्यात भांडणे, वादावादी होत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT