बापाकडून दारूड्या मुलाचा खून  
सांगली

Sangli Crime : बापाकडून दारूड्या मुलाचा खून

घरगुती वाद; मुलाच्या प्रतिहल्ल्या‍त वडीलही गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

जत : दररोज दारू पिऊन घरात वाद घालणाऱ्या मुलाशी वडिलांचे जोरदार भांडण झाले, त्याचे पर्यवसान मुलाच्या खुनात झाले. तसेच यावेळी मुलाने केलेल्या प्रतिहल्ल्यात वडीलही गंभीर जखमी झाले. जालिहाळ बुद्रुक (ता. जत) येथे ही घटना बुधवारी रात्री घडली. विश्वनाथ शिवराय पाटील (वय ३५) असे मृत मुलाचे नाव आहे. शिवराय गंगाप्पा पाटील (६५) असे गंभीर जखमी वडिलाचे नाव आहे. कौटुंबिक वादातून या बाप-लेकामध्ये झालेल्या सशस्त्र संघर्षाने परिसर हादरला. वडील शिवराय यांच्यावर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

जालिहाळ बुद्रुक येथील शेतातील घरामध्ये वडील आणि मुलामध्ये काही दिवसांपासून सातत्याने वाद होत होते. विश्वनाथ हा दारूच्या नशेत घरी येऊन वारंवार भांडण करीत असे. त्यामु‍ळे घरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते. बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास हा वाद पुन्हा उफाळून आला. वाद विकोपाला गेल्यानंतर शिवराय यांनी विश्वनाथ याच्यावर विळ्याने हल्ला केला. छातीवर गंभीर वार झाल्याने विश्वनाथ गंभीर जखमी झाला. मात्र विश्वनाथनेही प्रतिकार करत वडील शिवराय यांच्या पोटावर विळ्याने जोरदार वार केला. हा वार खोलवर बसल्याने तेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेत विश्वनाथ यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठविला. जखमी शिवराय पाटील यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी जालिहाळ बुद्रुक येथील पोलिसपाटील मारुती वसंत पाटील यांनी फिर्याद दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT