उमदीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू 
सांगली

Sangli Accident : उमदीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एक गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

जत : उमदी (ता. जत) येथे मंगळवेढा रस्त्यावर शेवाळे वस्तीजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात प्रवीण श्रीमक्कळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर संचित नीलकंठ हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी मंगळवेढा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उमदी-मंगळवेढा महामार्गावर गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू असताना हा अपघात घडला. उमदीतील प्रवीण आणि संचित हे दोघे दुचाकीवरून जात होते. शेवाळे वस्ती परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. अपघातात वर्मी मार लागल्याने प्रवीण श्रीमक्कळ याचा जागीच मृत्यू झाला, तर संचित नीलकंठ याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT