सांगली

सांगली : पत्नीचा दगडाने ठेचून खून; पती गजाआड

दिनेश चोरगे

जत; पुढारी वृत्तसेवा :  सुसलाद (ता. जत) येथे घरगुती वादातून पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. ललिता कल्लाप्पा कांबळे (वय 32) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. संशयित पती कल्लाप्पा इराप्पा कांबळे (43) याच्यावर गुन्हा दाखला आहे. याबाबतची भीमाणा मारुती कांबळे यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली. संशयित कल्लाप्पाला पोलिसांनी रात्री सुसलाद येथील एका घरातून अटक केली.

संशयित कलाप्पा गावातच (आंबेडकर नगर) येथे राहतो. वर्षभरापासून तो पत्नी ललिताशी दारू पिऊन भांडण काढत होता. बुधवारी कलाप्पाने ललिताशी भांडण काढले होते. त्यांची मुले जेवण करून झोपी गेली होती. रात्री ललिता झोपल्याचे पाहून कलाप्पाने दगडाने डोके ठेचले. त्यातच तिचा मृत्यू झाला. रात्री त्यांचा मुलगा पाणी पिण्यासाठी उठला असता आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसली. शेजारच्या लोकांनी आवाज ऐकून घटनास्थळी गर्दी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल साळुंखे, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार, पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण खरात घटनास्थळी आले होते. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार करीत आहेत.

टेरेसवर होता लपलेला

संशयीत खुनानंतर गावातीलच एका घरावरील टेरेसवर लपून बसला होता. रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी तो नशेत होता.

SCROLL FOR NEXT