file photo
सांगली

Sangli Crime: अपहरण करून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

जत पोलिसांत गुन्हा दाखल; बालविवाहाचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

जत : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आणि तिच्याशी बेकायदेशीर विवाह करून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकावर जत पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण आबासाहेब चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पॉक्सो, आणि बालविवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, २८ एप्रिल २०२६ रोजी आरोपीने संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही तिला फूस लावून घरातून पळवून नेले. त्यानंतर तिच्याशी बेकायदेशीर विवाह करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी ३१ जुलै रोजी जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विजय घेरडे व सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बिराप्पा लातुरे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT