लग्नाच्या आमिषाने सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार  Pudhari File Photo
सांगली

Sangli Crime : लग्नाच्या आमिषाने सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडिता गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उघड

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शिक्षणासाठी सांगलीत ये-जा करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वारंवार झालेल्या या अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली असून, याप्रकरणी संशयित प्रशांत रामचंद्र शिंगाडे (वय 21, रा. चोरोची, ता. कवठेमहांकाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जयसिंगपूर परिसरातील अल्पवयीन मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने सांगलीत येत होती. याच काळात संशयित प्रशांत शिंगाडे याने तिच्याशी ओळख वाढवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून 13 ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत संशयिताने तिला लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केले.काही दिवसांपूर्वी प्रकृतीअस्वास्थ्यामुळे पीडितेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. वैद्यकीय तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे समोर आले. रुग्णालयाने तिच्याकडे प्राथमिक चौकशी करून याबाबतची माहिती तत्काळ जयसिंगपूर पोलिसांना दिली. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रशांत शिंगाडे याच्यावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT