अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार File Photo
सांगली

Sangli Crime : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार

तिघांविरुद्ध पोक्सोसह गंभीर गुन्हे

पुढारी वृत्तसेवा

जत : लग्नाचे आमिष दाखवून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023, बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून सर्जेराव उर्फ सोनू निवृत्ती जगताप (रा. अनंतपूर, ता. अथणी), शिवराज माने (रा. जत) आणि सागर भिसे यांचा मेहुणा (पूर्ण नाव नाही) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुख्य संशयित सर्जीराव उर्फ सोनू जगताप याने पीडित मुलीशी मैत्री करून तिला लग्नाचे आमिष दाखवले. 1 मे 2026 पर्यंतच्या कालावधीत त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. या गुन्ह्यात इतर दोन संशयितांनी त्याला मदत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयितांनी मुलीला भाड्याच्या वाहनातून वेळापूर येथे नेल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT