नातेवाईक महिलेचा स्टेटस ठेवल्याने कोयत्याने हल्ला  File photo
सांगली

Sangli Crime : नातेवाईक महिलेचा स्टेटस ठेवल्याने कोयत्याने हल्ला

कवलापूर येथील प्रकार : संशयितावर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

सांगली : नातेवाईक महिलेचा स्टेटस ठेवल्याचा राग धरून कवलापूर येथील एका फळविक्रेत्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये विनोद रुबेन मोहिते (वय ३१, रा. मोहिते गल्ली, कवलापूर) हे जखमी झाले. दरम्यान याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात राहुल विजय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादी मोहिते यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. कवलापुरातील आझाद चौकात ते फळविक्री करीत होते. त्यावेळी संशयित राहुल विजय शिंदे (रा. कवलापूर) तेथे आला. त्याच्या नातेवाईकाचा स्टेटस विनोद यांनी मोबाईलवर ठेवला होता. याचा राग आल्याने संशयित राहुल याने विनोद यांच्या दोन्ही हातावर, कमरेवर कोयत्याने वार केला. त्यानंतर संशयित राहुल तेथून निघून गेला. जखमी अवस्थेत घरी गेलेल्या विनोद यांच्या घरी जाऊन संशयित अमोल मोहिते आणि अमोल भोरे यांनी ‘तुला बघून घेतो’ असे म्हणून त्यांना शिवीगाळ केली. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT