Pistol Arrest  File Photo
सांगली

Sangli Crime: पिस्तूल, दोन काडतुसांसह एकास अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला गजाआड केले

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला गजाआड केले आहे. जुना धामणी रोड परिसरात बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगून फिरणाऱ्या मधुसुदन महेश मगदूम (वय २४, रा. हसनी आश्रम, विश्रामबाग, सांगली) या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर आणि एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकाने जुना धामणी रोड परिसरात सापळा रचला होता. संशयित मधुसुदन मगदूम तेथे आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ६० हजार रुपये किमतीचे १ देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ हजार रुपये किमतीची २ जिवंत काडतुसे असा एकूण ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयिताकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याने पोलिस अंमलदार अभिजित माळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT