दोन गटात हाणामारी 
सांगली

Sangli News : सिद्धेवाडी येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी

तिघे जखमी : परस्परविरोधी फिर्यादी; १३ जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : सिद्धेवाडी (ता. तासगाव) येथे रस्त्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले आहेत. तासगाव पोलिस ठाण्यात दोन्ही गटाच्या एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या आहेत.

या मारहाणीत गोपाळ सुदाम चव्हाण, भारत रामचंद्र चव्हाण व सूरज गणपती चव्हाण हे तिघे जखमी झाले आहेत. जखमी फिर्यादी गोपाळ सुदाम चव्हाण (वय ४३) यांनी आठ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांडुरंग धोंडिराम चव्हाण, प्रथमेश धोंडिराम चव्हाण, सूरज गणपती चव्हाण, भरत रामचंद्र चव्हाण, पोपट रामचंद्र चव्हाण, दिलीप रामचंद्र चव्हाण, आयुष्य दिलीप चव्हाण व अधिक विठ्ठल चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसऱ्या गटातील जखमी फिर्यादी भरत रामचंद्र चव्हाण (वय ५१) यांनी दिलेल्या फिर्यादीत गोपाळ सुदाम चव्हाण, आकाश जयवंत चव्हाण, जयवंत महादेव चव्हाण, गुंडा बाळासाहेब चव्हाण व बाळासाहेब महादेव चव्हाण या पाच संशयितांचा समावेश आहे.

फिर्यादी गोपाळ चव्हाण हे वैरण घेऊन येत असताना संशयित पांडुरंग, प्रथमेश, सूरज, भरत, पोपट, दिलीप, आयुष व अधिक यांनी संगनमत करून 'इथून वैरण घेऊन जायचे नाही' असे म्हणत त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गोपाळ यांचा पुतण्या आकाश यालाही जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दुसऱ्या गटाचे फिर्यादी भरत चव्हाण हे शेतातून वैरण घेऊन येत असताना संशयित गोपाळ चव्हाण याने वाटेत ट्रॅक्टर उभा केला होता. भरत यांनी तो ट्रॅक्टर बाजूला घेण्यास सांगितले असता गोपाळ याने त्यांना मारहाण केली. गोपाळ यांचा कोयता भरत यांच्या पुतण्याला लागल्याने तो जखमी झाला. तसेच संशयित जयवंत, गुंडा व बाळासाहेब यांनी जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT