Crime News Pudhari
सांगली

Sangli Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने दोन गटात कोयत्याने हाणामारी

दोघे जखमी; पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मिरज : दारूस पैसे देण्यास नकार दिल्याने दोन गटाकडून एकमेकांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. एका गटातील संग्राम बाळासाहेब कांबळे, तर दुसऱ्या गटातील अभिलाश रवींद्र कांबळे अशी त्यांची नावे आहे.

याप्रकरणी संग्राम बाळासाहेब कांबळे याने अभिलाश रवींद्र कांबळे (वय 34) आणि शुभम कांबळे (दोघे रा. भीमनगर, मिरज) याच्याविरुद्ध, तर अभिलाश रवींद्र कांबळे याने संग्राम कांबळे, गणेश कांबळे, बाळू कांबळे, (तिघे रा. भीमनगर, मिरज) यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

संग्राम कांबळे हा दि. 17 रोजी साडेनऊ वाजता घरासमोर थांबला होता. त्यावेळी वरील दोघे संशयित तेथे आले. त्यानी दारूसाठी पैशाची मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला; यावेळी मध्यस्थी करणाऱ्या संग्राम कांबळे याच्या कुटुंबालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे त्याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दारूच्या पैशाच्या कारणातून झालेल्या वादानंतर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. यामध्ये गणेश कांबळे आणि बाळू कांबळे हे जखमी झाले असल्याचे मिरज शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT