Crime News pudhari photo
सांगली

Sangli News : एसटीच्या मेलवर पाठविला अश्लील संदेश

तासगावच्या सहायक कार्यशाळा अधीक्षकावर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव येथील एसटी आगाराच्या कार्यशाळेत कार्यरत कर्मचारी आणि त्याच्या पत्नीविषयी मेलवर अश्लील संदेश पाठविल्याप्रकरणी सहायक कार्यशाळा अधीक्षक यांच्याविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी श्रीधर बबन पवार (रा. वृंदावन कॉलनी, तासगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

निसार अहमद इब्राहिम नदाफ (रा. कवठेपिरान, ता. मिरज) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी श्रीधर आणि संशयित नदाफ हे दोन्ही एसटी महामंडळाच्या तासगाव कार्यशाळेत कार्यरत आहेत. फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, संशयित निसार अहमद नदाफ याने दि. २० जून रोजी सायंकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी फिर्यादी श्रीधर आणि त्यांच्या पत्नीचा फोटो एसटी महामंडळाच्या अधिकृत ई-मेलवर पाठवला. तसेच त्या मेलच्या 'सब्जेक्ट'वर अश्लील मजकूर लिहून तो प्रसारित केला. हा वादग्रस्त मेल एसटी महामंडळाच्या अधिकृत मेलवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली. तासगाव पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT