सांगली : उच्च न्यायालयाने सांगलीत प्रवेश करण्यास मनाई केली असतानाही, शहरात प्रवेश करून एकास मारहाण, तसेच वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी एकाविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश ऊर्फ सौरभ सदाशिव वाघमारे (रा. शंभरफुटी, सांगली) असे त्याचे नाव आहे.
सौरभ वाघमारे याच्याविरुद्ध खुनाच्या गुन्ह्यासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने त्याला सांगली जिल्ह्यात प्रवेश करण्यास मनाई केली होती. परंतु तरीही त्याने सांगलीत प्रवेश केला व एका लॉजवर राहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला लॉजवर राहण्यास विरोध केल्याने त्याने साहेल सलीम सनदी याला मारहाण केली व वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.