सांगली : जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याकडील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली, मिरज, तासगाव, इस्लामपूर, विटा व जत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात एकाचवेळी आदान-प्रदान कार्यक्रम पार पडला.
या मोहिमेंतर्गत खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मालमत्तेचे गुन्हे, अमली पदार्थ व शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची झडती घेण्यात आली. एकूण 240 आरोपी उपविभागनिहाय हजर करण्यात आले. पोलिस अधिकार्यांनी प्रत्येक आरोपीकडून त्यांचे सध्याचे राहणीमान, उपजीविकेची साधने, संपर्क क्रमांक, व्यवसाय, मित्रपरिवार, नातेवाईकांची माहिती, मोबाईल नंबर व ठिकाण याची सविस्तर माहिती घेऊन ‘इंटरोगेशन फॉर्म’ भरून घेतले. आरोपी पुन्हा गुन्हेगारीच्या वाटेला गेल्यास त्यांच्यावर कठोर प्रतिबंधक कारवाई केली जाईल. डी. बी. पथक व बीट मार्शल यांनी जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींवर सतत लक्ष ठेवावे, वारंवार गुन्हे करणार्या आरोपींविरुद्ध तडीपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक घुगे यांनी दिले. गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या आरोपींवर एमपीडीए व मोकाअंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला.
सांगली 43
मिरज 28
इस्लामपूर 35
तासगाव 36
विटा 56
जत 42
एकूण 240