वडिलांच्या खुनाबद्दल तरुणास जन्मठेप 
सांगली

Sangli Crime : वडिलांच्या खुनाबद्दल तरुणास जन्मठेप

परगावी जाण्यासाठी पैसे न दिल्याने केला होता वडिलांचा खून

पुढारी वृत्तसेवा

सांगली : परगावी जाण्यासाठी पैसे दिले नाहीत, या कारणावरून वडिलांचा खून केल्याबद्दल प्रवीण देवाप्पा मोडे (वय 26, रा. आसंगी, ता. जत) याला जन्मठेप व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सांगली येथील जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एम. एस. काकडे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील मेघा पाटील यांनी काम पाहिले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी, जून 2021 मध्ये ही घटना घडली होती. संशयित प्रवीण मोडे बाहेरगावी जाणार होता. त्यासाठी त्याने वडील देवप्पा खिराप्पा मोडे (वय 55) यांच्याकडे पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने प्रवीणने लाकडी दांडक्याने वडील देवाप्पा यांना बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेले देवाप्पा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याप्रकरणी प्रवीणच्या आईने उमदी पोलिसांमध्ये फिर्याद दिली. उपनिरीक्षक एन. बी. दांडगे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले. फिर्यादी व अन्य साक्षी, पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने प्रवीणला जन्मठेप व दंड, दंड न भरल्यास 6 महिने जादा शिक्षा सुनावली. सरकार पक्षाला उमदी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक तुराई, शिवाजी माळी, वंदना मिसाळ यांनी मदत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT