Heatwave Pudhari
सांगली

Sangli Heatwave: उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण

दुपारी रस्ते ओस : पुढील आठवडा तापमान वाढ कायम राहणार

पुढारी वृत्तसेवा

सांगली : सांगली सह जिल्ह्याच्या विविध भागात पारा चाळिशी पार करून तो 41 अंशावर गेला आहे. कमाल व किमान तापमानात वाढ झाली असून उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारी रस्ते ओस पडत असून थंड त्यांना मागणी वाढलेली आहे.

दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात, डोकेदुखी, चक्कर येणे, अशक्तपणा, त्वचेचे आजार आदी समस्या उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्याची योग्य काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दरम्यान तापमानात वाढ झाल्याने पिकांना पाण्याची मागणी वाढलेली आहे . त्यामुळे तलाव, विहिरी व जमिनीतील पाणी पातळी चांगलीच खालालत आहे. धरणातील पाणीसाठा ही झपाट्याने कमी होत आहे.

सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला. यंदा उन्हाळा ही फेब्रुवारी महिन्यापासूनच जाणवत आहे . मात्र एप्रिल मध्ये कमाल व किमान तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पाण्याची टंचाई भासणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र यंदा उन्हाचा तडाखा जोरदार असल्याने पिकांना पाण्याची मागणी वाढलेली आहे. बागायती क्षेत्र वाढलेले आहे. त्यामुळे तलाव विहिरी व जमिनीतील पाणी उपसा झपाट्याने होत आहे.

यंदा आतापर्यंत तापमानाचा पारा 40 अंशाच्या वरती गेलेला नव्हता . गुरुवारपासून तापमानाचा पारा 41 अंशावर गेलेला आहे. कमाल व किमान तापमानात वाढ झाल्याने उकाडा चांगला जाणवत आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असून थंड पेयांना मागणी वाढलेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT