सांगली

सांगली : मराठा आरक्षणासाठी वडवळ येथे सरकारच्या निषेधार्थ साखळी उपोषण; सामुदायिक मुंडण व रक्तदान शिबिर

backup backup

मोहोळ; पुढारी वृतसेवा : क्षेत्र वडवळ (ता. मोहोळ) येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी सरकारच्या निषेधार्थ साखळी उपोषण, सामुदायिक मुंडण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

तीन दिवसीय साखळी उपोषण व आंदोलनात सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत गावफेरीने आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या साखळी उपोषणात वेगवेगळे कार्यकर्ते उपोषणस्थळी बसणार आहेत. आज सरकार निषेधार्थ सामुदायिक मुंडण आणि रक्तदान शिबिर आयोजित केले होते. संध्याकाळी प्रबोधनपर भजन आणि भारुड कार्यक्रम होणार आहे.

उपस्थित सर्व मराठा समाजातील तसेच इतर जाती धर्माचे लोक उपस्थित राहून पाठिंबा देत होते. मोहोळ तालुका येथील मराठा समाजातील प्रतिनिधींनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी गावातील सर्व स्तरातील जाती धर्मातील लोक आवर्जून उपस्थित होते. सरपंच जालिंदर बनसोडे, सुरेश शिवपुजे, अकाशबुवा शिवपुजे, मनोज मोरे सुर्यकांत मोरे, राहुल मोरे, शाहु धनवे, सचिन चव्हाण,आप्पा चव्हाण, संजय जगताप, संतोष गायकवाड, वैभव गुंड, जयवंत गुंड, संजय साळुंखे, अविनाश व्यवहारे, लक्ष्मण मळगे, शाहीर पवार,तानाजी गुंड, सखाराम मोरे, कैलास केदार, गणेश मोरे, भिमराव मोरे,सुदर्शन मोरे, राजु मोरे, दादासाहेब काकडे, धनाजी पवार, श्रीकांत शिवपुजे, सचिन मोरे, प्रविण मोरे, धनाजी नरळे, संतोष नरळे, शाहीर गुंड, अजित काकडे, सुरज धनवे, दिलीप माने, गब्बर लंबे,सोमा गुंड, साईनाथ जगताप, अजित काकडे, तय्यब तांबोळी, बाळासाहेब नरळे तसेच गावातील तरुण, ज्येष्ठ, विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT