Sangli Accident: कणेगाव फाट्याजवळ बस दुभाजकाला धडकली Pudhari
सांगली

Sangli Accident: कणेगाव फाट्याजवळ बस दुभाजकाला धडकली

पुणे-बेंगळुरू महामार्गावर टायर फुटल्याने अपघात

पुढारी वृत्तसेवा

कुरळप : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील हिरकणी बसचा पुढील टायर अचानक फुटल्याने बस अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. हा भीषण अपघात शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कणेगाव फाट्याजवळ घडला.

आजरा आगाराची आजरा-पुणे (स्वारगेट) ही हिरकणी बस (क्र. एमएच 14 केक्यू 9664) शुक्रवारी सकाळी पुण्याच्या दिशेने निघाली होती. ती कणेगाव फाट्याजवळ आली असता, बसचा चालक बाजूचा पुढचा टायर मोठ्या आवाजासह फुटला. टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या सिमेंटच्या दुभाजकावर जाऊन आदळली. बस दुभाजकाला धडकताच प्रवाशांनी आरडाओरडा केला.

मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत बस सावरल्याने ती उलटली नाही. बस विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवर न गेल्यामुळे मोठा अपघात टळला. या अपघातात काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच कुरळप पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT