Burglary Pudhari
सांगली

Sangli burglary case: सांगलीत घरफोडी; १ लाख ६५ हजारांचे दागिने लंपास

अभयनगर परिसरात भरदिवसा घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : येथील अभयनगर परिसरात भरदिवसा घरफोडीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. सुवर्णा कृष्णदेव रसाळे (वय ५३, रा. अभयनगर) या कामानिमित्त दि. २३ मे २०२६ ते १ जून २०२६ या कालावधीत घराबाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटाचे कुलूप तोडून आत ठेवलेले सुमारे १,६५,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, चोरट्यांनी बंद घर असल्याचे पाहून कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील कपाटाचे कुलूप तोडून ४२,५०० रुपयांचे १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ५०,००० रुपयांचे दोन तोळ्यांचे गंठण, २५,००० रुपयांची प्रत्येकी अर्धा तोळ्याची दोन सोन्याची पेन्डेंट, तसेच कानातील सोन्याचे टॉप्स, बदाम, गळ्यातील बारीक मणी, बाळाच्या बारशाचे दागिने आणि १०,००० रुपये किमतीचे चांदीचे पैंजण व छल्ला असा ऐवज चोरून नेला आहे.

याप्रकरणी सुवर्णा रसाळे यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सांगली विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT