theft Pudhari
सांगली

Sangli Theft : उंबरगावात डॉक्टरांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला

८६ हजारांचा ऐवज लंपास

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : उंबरगाव (ता. आटपाडी) येथे अज्ञात चोरट्यांनी एका डॉक्टरांच्या बंद घराला लक्ष्य करत सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २ ते ११ नोव्हेंबर दरम्यान घडली.

याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात अज्ञात रट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. अशोक महादेव लवटे (वय ४९, सध्या रा. विटा, ता. खानापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे मूळ गाव उंबरगाव असून, त्यांच्या घरात कोणाचेही नसताना संधी साधून अज्ञात चोरट्याने घरातील ऐवज लांबवला.

चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये २२ हजार रुपये किमतीची २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, २२ हजार रुपये किमतीच्या २.५ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील रिंगा आणि ५०० रुपयांच्या नोटांमधील ४२ हजार रुपयांची रोकड, असा एकूण ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल आहे. याप्रकरणी पुढील तपास आटपाडी पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT