Youth Dies of Electric Shock Pudhari
सांगली

Borgaon Electric Shock : बोरगावात विजेचा धक्का बसून मजुराचा मृत्यू

ट्रान्स्फॉर्मरवर काम करीत असताना घडली घटना

पुढारी वृत्तसेवा

बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील रस्त्यावर नवीन बसवलेल्या ट्रान्स्फॉर्मरवर चढून काम करीत असताना विजेचा धक्का बसल्याने जुम्मन मो नसीम (वय 19, रा. रामपूर कुदरकट्टी गडबनैली अररिया फोर्बेसगंज (बिहार सध्या रा. पेठनाका ता. वाळवा) याचा जागीच मृत्यू झाला.

येथील आरोग्य केंद्राच्या रोडवर काही दिवसांपूर्वी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवला आहे. याच ट्रान्स्फार्मरवर गार्डिंगचे काम करण्याकरिता सिनियर सुपरवायझर सुधीरकुमार गोरेलाल विश्वकर्मा हे मजूर घेऊन गेले होते. जुम्मन मो नसीम हा ट्रान्स्फार्मरवर चढून गार्डिंगचे काम करीत होता. यावेळी विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. काही कालावधीत विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर सहकाऱ्यांनी त्याला खाली उतरवून खासगी रुग्णवाहिकेतून ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वीच नसीमचा मृत्यू झाला होता. सदरच्या घटनेची फिर्याद कंपनीचे सिनियर सुपरवायझर सुधीरकुमार विश्वकर्मा यांनी ईश्वरपूर पोलिस ठाण्यात दिली असून अधिक तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT