Theft Pudhari
सांगली

Sangli theft: बिळूर येथे पुजारी असल्याचे सांगत देवीचे मंगळसूत्र लंपास

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून गंडा

पुढारी वृत्तसेवा

जत : देवाचा पुजारी असल्याचे सांगून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने देवीला घातलेले सोन्याचे मंगळसूत्र व दोन मोबाईल लंपास केले. ही घटना बिळूर (ता. जत) येथे घडली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अण्णासाहेब बसगोंडा चौधरी हे दि. 12 मे रोजी दुपारी कुटुंबासह शेतात कामासाठी गेले होते. तेव्हा अज्ञात चोरटा घराजवळ आला. त्याने ‌‘मी देवाचा पुजारी आहे, पिण्यासाठी पाणी द्या,‌’ असे सांगत घरात प्रवेश मिळविला.

घरातील महिलेला बाहेर बसवून तो काहीवेळ घरात थांबला व काही वेळाने निघून गेला. त्यानंतर घरातील दोन मोबाईल, तसेच देव्हाऱ्यात देवीला घातलेले 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT