आटपाडी ः करगणी (ता. आटपाडी) येथील पुकळे वस्तीजवळ ट्रॅव्हल्स बसने दुचाकीस धडक दिल्याने शामराव रामू खिलारी (वय 55, रा. करगणी) या शेतकर्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना 24 जुलैरोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली.
याबाबत मारुती भीमराव खिलारी (वय 42, रा. करगणी) यांनी फिर्याद दिली आहे. शामराव रामू खिलारी हे रात्री दुचाकीवरून (एमएच 10 बीके 7507) घरी परतत होते. करगणी ते भिवघाट रस्त्यावर पुकळे वस्तीजवळ समोरून वेगाने येणार्या ट्रॅव्हल्स बसने (एआर 11 ईफ 9192) त्यांना जोरदार धडक दिली. चालकाने बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवत समोरून येणार्या दुचाकीस जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. या धडकेत शामराव खिलारी यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. त्याचे नाव व पत्ता समजू शकले नाही.