Accident File Photo
सांगली

Sangli Accident : टेम्पोच्या साऊंड बॉक्सला दुचाकीची धडक एकाचा मृत्यू; दोघे जखमी

मोरगावच्या अग्रणी नदी पुलाजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ-देशिंग मार्गावरील मोरगावच्या अग्रणी नदी पुलाजवळ डीजे साऊंड सिस्टिमचे बॉक्स जोडलेल्या टेम्पोच्या पाठीमागील बॉक्सला दुचाकीने जोरदार धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. काशिनाथ बापू नंदीवाले (वय ४२, रा. कोथळी, ता. शिरोळ) असे मृताचे नाव आहे. परशुराम बापू नंदीवाले व माणिक नाकाराम नंदीवाले (दोघेही रा. कोथळी) हे जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. २१) सायंकाळी हा अपघात झाला.

मिरज तालुक्यातील कळंबी येथून डीजे साऊंड सिस्टिमचे बॉक्स जोडलेला टेम्पो (एमएच ०४, डीके ००८१) कवठेमहांकाळच्या दिशेने येत होता. त्याचवेळी कवठेमहांकाळहून कोथळी येथे जाणारे तिघे दुचाकी (एमएच ५१ एच ५९०४) वरून प्रवास करीत होते. मोरगावच्या अग्रणी नदी पुलाजवळ दुचाकी टेम्पोच्या पाठीमागील साऊंड बॉक्सला जोरदार धडकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT