जल्लोषात फटाक्यामुळे दुचाकी जळाली pudhari photo
सांगली

Sangli News : जल्लोषात फटाक्यामुळे दुचाकी जळाली

जल्लोषात फटाक्यामुळे दुचाकी जळाली

पुढारी वृत्तसेवा

सांगली : भारताने टी-20 विश्वचषक पटकावल्यानंतर रविवारी रात्री शहरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू होती. यादरम्यान फटाक्याची ठिणगी उडाल्याने एक दुचाकी जळून खाक झाली. हा प्रकार खणभागातील भोई गल्ली परिसरात घडला. दुचाकीमध्ये पेट्रोल भरत असताना हा प्रकार घडला. यामध्ये एक भाजून जखमी झाला.

क्रिकेट स्पर्धेत भारताने न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर सांगलीत ठिकठिकाणी रात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. खणभागातील भोई गल्ली परिसरातही जोरदार फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. फटाक्यांची माळ लावल्यानंतर सर्वत्र ठिणग्या उडत होत्या. याचवेळी भोई गल्लीत एकाच्या दुचाकीमधील पेट्रोल संपले. तेव्हा तो बाटलीतून दुचाकीत पेट्रोल ओतत होता. नेमके त्याचवेळी फटाक्यांच्या माळेच्या ठिणग्या उडून त्याच्या दुचाकीजवळ आल्या. ठिणग्यांनी पेट्रोलचा भडका उडाला. त्यामुळे पेट्रोल ओतणाऱ्या व्यक्तीचा हात भाजला. तसेच दुचाकीनेही पेट घेतला. क्षणार्धात आगीचा भडका उडाला. त्यामध्ये दुचाकी जळून खाक झाली. परिसरातील नागरिकांनी तातडीने पाणी मारून आग आटोक्यात आणली. महापालिका अग्निशमन दलासदेखील कळविण्यात आले. परंतु अग्निशमन दल पोहोचेपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती. हाताला भाजलेल्या व्यक्तीस तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT