Accident File Photo
सांगली

Sangli Accident : भागाईवाडीतील तरुणाचा ऊस ट्रॉलीला धडकून मृत्यू

शिराळा तालुक्यातील कांदे-नाटोली रस्त्यावर चिखली गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : शिराळा तालुक्यातील कांदे-नाटोली रस्त्यावर चिखली गावाकडे जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात भागाईवाडी (ता. शिराळा) येथील रोहित शामराव शिंदे (वय २५) या तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवार, दि. २४ नोव्हेंबररोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रोहित हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता.

या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. दीपक बनसोडे यांनी शिराळा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या अपघाताचा पुढील तपास शिराळा पोलिस करत आहेत.

ऊस वाहतुकीच्या हंगामात रस्त्यांवर ठिकठिकाणी उभ्या केल्या जाणाऱ्या ऊस ट्रॉलींमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या ट्रॉली वाहनचालकांना सहज दिसून येत नसल्याने जीवघेणे अपघात घडत आहेत. रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ट्रॉलींवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच त्यांना रिफ्लेक्टर आणि इतर सुरक्षा साधने लावण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT