fraud Pudhari Photo
सांगली

Sangli Bedana Fraud : बेदाणा व्यापाऱ्यांची दोन लाखांची फसवणूक

ऑनलाईन खरेदीचा बनाव ः दोघांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : येथील एका बेदाणा व्यापाऱ्याकडून ऑनलाइन पद्धतीने बेदाणा खरेदी करून त्याची सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी नवी मुंबई आणि नाशिक येथील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.

सावर्डे (सध्या रा. दत्त कॉलनी, तासगाव) येथील बेदाणा व्यापारी विजयसिंह लक्ष्मणराव पाटील यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पाटील यांचा बेदाणा कवठेएकंद हद्दीतील सिद्धिविनायक कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला होता. 24 ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत संशयितांनी पाटील यांच्याशी संपर्क साधून ऑनलाइन पद्धतीने बेदाणा खरेदी केला. हा बेदाणा फिर्यादींनी संशयितांच्या अपेक्स ट्रेडिंग कंपनी (मार्केट यार्ड) येथे पोहोच केला होता.

संशयित रवींद्र शांताराम कदम (रा. नवी मुंबई) आणि प्रसाद शंकर गांगुर्डे (रा. चांदवड, जि. नाशिक) यांनी सुरुवातीला काही रक्कम आरटीजीएसद्वारे पाटील यांच्या बँक खात्यावर पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, व्यवहारातील उर्वरित 1 लाख 93 हजार 682 रुपये देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. पाटील यांनी वारंवार पैशांची मागणी करूनही संशयितांनी दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिसात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT