Plastic free  Pudhari File Photo
सांगली

Sangli News : बागणीत ‘प्लास्टिकमुक्त गाव’ मोहीम

सरपंच तृप्ती हवलदार यांचा पुढाकार; ग्रामपंचायत कचरा विकत घेणार

पुढारी वृत्तसेवा

बागणी : वाळवा तालुक्यातील बागणी येथे प्लास्टिकमुक्त गाव मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी सरपंच तृप्ती संदीप हवलदार यांनी पुढाकार घेतला आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्लास्टिकचा कचरा ग्रामपंचायत दहा रुपये किलोप्रमाणे विकत घेणार आहे.

वाढत्या प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने निर्माण झाली आहेत. यासाठी प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन गरजेचे आहे. यात विद्यार्थ्यांचा सहभाग गरजेचा आहे. शाळांमधील मुले व शिक्षकांच्या माध्यमातून प्रभात फेऱ्या काढून जनजागृती करण्यात येणार आहे. सरपंच तृप्ती हवलदार म्हणाल्या, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व निरोगी वातावरण देण्यासाठी प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे व घरातील प्लास्टिक कचरा विलगीकरण करावा, असे त्या म्हणाल्या.

सरपंच हवलदार म्हणाल्या, प्लास्टिकमुक्त गाव ही संकल्पना पर्यावरण रक्षणासाठी आणि गावे स्वयंपूर्ण व स्वच्छ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गावात प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक थर्माकोल, थर्माकोल आणि एकच वेळ वापरले जाणारे प्लास्टिक पूर्णपणे बंद करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. प्लास्टिकमुक्त गावाचे फायदे अनेक आहेत. पर्यावरण रक्षण : मातीची नासाडी थांबते आणि प्रदूषण कमी होते. आरोग्य सुधारणा : जनावरांच्या पोटात प्लास्टिक जाण्यापासून बचाव होतो आणि साथीचे आजार टाळता येतात. स्वच्छता: गावात कचरा साचत नाही व गावाला सुंदर रूप मिळते. पाणी साचण्याची समस्या सुटते. गटारे तुंबण्याचे प्रकार बंद होतात. प्लास्टिक बँक/कचरा संकलन. गावातील वेगवेगळ्या ठिकाणी प्लास्टिक गोळा करण्यासाठी 'प्लास्टिक बँक' किंवा लहान कचरा कुंडी उभारणे आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT